Corona in satara : कराडमध्ये ६० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ; १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 02:18 PM2020-04-07T14:18:41+5:302020-04-07T14:27:11+5:30
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल ६० वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
सातारा : कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आलेल्या ७ अनुमानित रुग्णांपैकी ६० वर्षीय पुरुष कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
उर्वरित ६ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत ९ निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले असल्याचे एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
सोमवार दि. ६ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे २ रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत.
या एकूण १६ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच काल दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला २५ वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री 1 च्या सुमारस त्याला कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या नियमानुसार उपचार चालू आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.