corona in satara-जिल्ह्यात एकाच दिवसात १२१ कोरोना संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 10:24 AM2020-04-25T10:24:15+5:302020-04-25T10:32:41+5:30
जिल्ह्यात कोरोना संशयितांचा आकडा वाढत असून, शुक्रवारी एका दिवसांत १२१ जणांना कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून तीन नागरिकांचे अहवाल अनिर्णित आहेत.
सातारा : जिल्ह्यात कोरोना संशयितांचा आकडा वाढत असून, शुक्रवारी एका दिवसांत १२१ जणांना कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून तीन नागरिकांचे अहवाल अनिर्णित आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी ३३, कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे २४, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे ३०, फलटण येथे २ व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे ३२, असे एकूण १२१ जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सिव्हिलमध्ये दाखल असणाऱ्या एका बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २२, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 4, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथील ४ व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील १ असे एकूण ३१ जाणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून सातारा येथील २ व कऱ्हाड येथील १ असे एकूण ३ नागरिकांचे अहवाल अनिर्णित आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा २१ वर असून, एकट्या कऱ्हाडमध्ये ११ कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे कऱ्हाड हा सध्या हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे.