corona in satara : कोरोना बाधितांचा आकडा शतकाकडे, रुग्ण संख्या ९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 02:41 PM2020-05-07T14:41:50+5:302020-05-07T14:44:26+5:30

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली असून गुरूवारी सकाळी आणखी नव्या तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा ९५ वर गेला आहे. या नवीन रुग्णात साताऱ्यातील एकाचा तर कऱ्हाडमधील दोघांचा समावेश असून हे सर्वजण निकट सहवासित आहेत. तर नव्याने १३० संशयितांना दाखल झाले आहे.

corona in satara | corona in satara : कोरोना बाधितांचा आकडा शतकाकडे, रुग्ण संख्या ९५

corona in satara : कोरोना बाधितांचा आकडा शतकाकडे, रुग्ण संख्या ९५

Next
ठळक मुद्देकोरोना बाधितांचा आकडा शतकाकडे, रुग्ण संख्या ९५साताऱ्यात एक अन् कऱ्हाडमध्ये दोघेजण वाढले, संशयित १३० दाखल

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली असून गुरूवारी सकाळी आणखी नव्या तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा ९५ वर गेला आहे. या नवीन रुग्णात साताऱ्यातील एकाचा तर कऱ्हाडमधील दोघांचा समावेश असून हे सर्वजण निकट सहवासित आहेत. तर नव्याने १३० संशयितांना दाखल झाले आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढू लागला आहे. यामध्ये दररोज नवीन रुग्णांची भर पडत चालली आहे. बुधवारी नवे १२ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये कऱ्हाड 
तालुक्यातील १० जणांचा समावेश होता. असे असतानाच आता गुरूवारी आणखी जिल्ह्यातील तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामधील दोघे रुग्ण हे कऱ्हाड  तालुक्यातील आहेत. तर एकजण सातारा शहरातील आहे.

कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षांच्या वृध्दाला कोरोना झाल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. तसेच साताºयातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल ७० वर्षीय वृध्दाही कोरोना बाधित आहे. ही वृध्दा सातारा शहरातील आहे. हे तिघेही कोरोना रुग्णांच्या निकट सहवासित आहेत.

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात ७, वेणूताई चव्हाण उपजिल्हायात १०२, फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये २१ अशाप्रकारे एकूण १३० जणांना कोरोनाच्या संशयावरुन विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


चौकट :

२३ जणांचा अहवाल निगेटिव्ह...

जिल्ह्यात विविध ठिकाणी दाखल असणाºया २३ जणांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. यामध्ये दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक, कºहाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ११, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय १ व फलटण उपजिल्हा रुग्णालयातील १० जणांचा समावेश आहे.
..................................

Web Title: corona in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.