corona in satara : जिल्ह्यात पती-पत्नीसह ८ जण कोरोनाबाधित : एकूण १४६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 01:05 PM2020-05-19T13:05:23+5:302020-05-19T13:07:11+5:30
सातारा : जिल्ह्यातील आणखी ८ जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी सकाळी स्पष्ट झाले. यापैकी मायणी येथील दोघे जण पती-पत्नी आहेत. ...
सातारा : जिल्ह्यातील आणखी ८ जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी सकाळी स्पष्ट झाले. यापैकी मायणी येथील दोघे जण पती-पत्नी आहेत. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूर्ण संख्या १४६ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली
मुंबईवरुन प्रवास करुन आलेला लोणंद (ता. खंडाळा) येथील युवक (वय ३३) व अकोला येथून प्रवास करुन आलेले मायणी (ता. खटाव) येथील दाम्पत्य (वय अनुक्रमे ५५ व ४८) कोरोनाबाधित आढळून आले.
या तिघांवर येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. मायणी येथील दाम्पत्यासोबतच त्यांच्या मुलाच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत त्याचा अहवाल आला नव्हता. म्हासोली (ता. कºहाड) गावातील कोविड बाधित रुग्णाच्या निकट सहवासित दोन पुरुष (वय अनुक्रमे ४५ व ६२) आणि तीन महिला (वय अनुक्रमे ४८, ३५ व ६0 ) या पाच जणांवर कºहाड येथील कृष्णा हॉस्टिपलमध्ये उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- १४६ झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या ७१ इतकी असून कोरोना मुक्त होऊन घरी गेलेले रुग्णसंख्या ७३ आहे तर २ रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडल आहेत.
कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील १0 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवार, दि.१८ मे रोजी रात्री उशीरा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ३२ जणांना दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
उपचार सुरु असतानाच महिला पसार...
मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली ५८ वर्षीय खंडाळा येथील एका महिलेचा अहवाल कोविड बाधित आल्याने या महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ही महिला मुंबई येथे वास्तव्यास असतानाच ती कोरोनाबाधित झाली होती. मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु असतानाच ती आपल्या मुलासह तिथून पसार होऊन खंडाळ्यात दाखल झाल्याची माहिती पुढे येत आहे.
संबंधित महिला व तिचा मुलगा रीतसर परवानगी घेऊन सातारा जिल्ह्यात दाखल झाले होते का? याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. संबंधित महिलेवर मुंबई येथे उपचार झाल्याने या महिलेची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणना केली गेली नाही.