corona in satara : सातारा जिल्ह्यात नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह, आतापर्यंत ९५ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 02:27 PM2020-05-07T14:27:02+5:302020-05-07T14:30:25+5:30
कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारी ७० वर्षीय महिला अशा एकूण ३ निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
सातारा : कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारी ७० वर्षीय महिला अशा एकूण ३ निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील १, कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील ११, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथील १ व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील १० असे एकूण २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
१३० जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
६ मे रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ७, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे १०२, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे २१ असे एकूण १३० जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- ७९, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- १४, कोरोना बाधित मृत्यु- २ तसेच जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- ९५ इतकी आहे.