corona in satara :साताऱ्यासाठी दिलासादायक; ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:30 PM2020-05-26T15:30:22+5:302020-05-26T15:31:20+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच मंगळवारी सकाळी मात्र जिल्ह्यासाठी काहीसा दिलासा मिळाला. कारण, ९१ संशयितांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर नवीन ४७ संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच मंगळवारी सकाळी मात्र जिल्ह्यासाठी काहीसा दिलासा मिळाला. कारण, ९१ संशयितांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर नवीन ४७ संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धापासून बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. तर मे महिन्यापासून बाधित रुग्णांचा वाढता आकडा ऐकून धडकी भरावी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळेच सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा ३३६ वर गेला आहे. तर कोरोनामुळे ९ जण मृत्युमुखीही पडले आहेत. त्यामुळे दरररोजच रुग्ण किती सापडले याकडे सर्वांचेच लक्ष असते. असे असतानाच मंगळवारी सकाळी मात्र, आलेल्या अहवालानुसार रुग्णालयात दाखलपैकी ९१ जण निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ४७ संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सोमवारी रात्री उशिरा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील १४ व कºहाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ३३ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
.