corona in satara-खटाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:30 PM2020-05-12T12:30:02+5:302020-05-12T12:35:03+5:30
खरशिंगे (ता.खटाव ) येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने पुसेसावळीसह औंध परिसरातील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बांधितांची संख्या आता १२१ झाली आहे.
पुसेसावळी (सातारा): खरशिंगे (ता.खटाव ) येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने पुसेसावळीसह औंध परिसरातील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बांधितांची संख्या आता १२१ झाली आहे.
ठाणे येथून एक कुटुंब दुचाकीवरून खरशिंगे येथे आले होते. त्यानंतर त्या कुटुंबाला गावानजीक असणाऱ्या त्यांच्या घरात होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. या कुटुंबातील एकाला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले होते.
तरी त्यांच्या संपर्कातील २१ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तरी संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे प्रशानाकडून खरशिंगे गाव पूर्णपणे सिल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेवरून खटाव तालुक्यातील गावांनी मुंबई-पुणे व बाहेरील गावावरून येणार्यांना गावातील शाळेमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवणेचे गरजेचे आहे.