corona in satara-जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 07:40 PM2020-03-26T19:40:23+5:302020-03-26T19:46:07+5:30
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये ट्रॅक्टर चालक आणि हॉटेल मालकाचा समावेश आहे.
सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये ट्रॅक्टर चालक आणि हॉटेल मालकाचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील सोनगाव येथील अप्रतिम हॉटेल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता हॉटेलमधील कामगारांना कामावर बोलावून हॉटेल सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सातारा तालुका पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल मालक रमेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा तालुक्यातील नेले गावच्या परिसरात ट्रॅक्टरमधून सात ते आठ लोकांना बसवून अवैद्य प्रवासी वाहतूक करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी विशाल जाधव (रा. नेले, ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.