corona in satara : मृत ७० वर्षीय महिला अन् ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 01:58 PM2020-04-21T13:58:03+5:302020-04-21T14:00:33+5:30

कऱ्हाड तालुक्यातील दोन जणांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला होता. त्यातील ७० वर्षीय महिला रुग्णाचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.

corona in satara Report of deceased 4-year-old woman and other suspects also negative | corona in satara : मृत ७० वर्षीय महिला अन् ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह

corona in satara : मृत ७० वर्षीय महिला अन् ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह

Next
ठळक मुद्दे मृत ७० वर्षीय महिला अन् ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह३ नागरिक विलगीकरण कक्षात दाखल, एका रुग्णावर आणखी ५ दिवस उपचार

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील दोन जणांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला होता. त्यातील ७० वर्षीय महिला रुग्णाचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.

त्यामुळे तिचा मृत्यू श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे झाला असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. तर इतर ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. ३ नागरिक नव्याने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून विलगीकरण कक्षातील एका रुग्णाव आणखी ५ दिवस उपचार करण्यात येणार आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे १२, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील २२, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड व फलटण येथील प्रत्येकी १ असे एकूण 36 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथे काल मृत्यु झालेल्या 70 वर्षीय महिलेचा नमुनाही निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

काल सोमवारी दि. २० एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ३ नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसगार्मुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

येथे दाखल असणाऱ्या बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचा एक अहवाल पॉझिटिव्ह व दुसरा अहवाल कोणताही निष्कर्ष काढता येत नसल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस उपचार व पुनर्तपासणी करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

Web Title: corona in satara Report of deceased 4-year-old woman and other suspects also negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.