आळजापूरमध्ये लोकसहभागातून कोरोना विलगीकरण सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:05+5:302021-04-28T04:42:05+5:30
आदर्की : देश, राज्य, जिल्हा, तालुका, गावावर आलेले कोरोनाच्या संकटावर सर्वांनी एकत्र येऊन मात करण्यासाठी जात, पात, धर्म, गरीब, ...
आदर्की : देश, राज्य, जिल्हा, तालुका, गावावर आलेले कोरोनाच्या संकटावर सर्वांनी एकत्र येऊन मात करण्यासाठी जात, पात, धर्म, गरीब, श्रीमंत यांना फाटा देत आळजापूर ग्रामस्थ, संस्था यांनी मिळून पंधरा बेडचे विलगीकरण कोरोना सेंटर सुरू केले आहे.
आळजापूरसह परिसरात वाढती रुग्णसंख्या व शहरातील खासगी, शासकीय दवाखान्यांत बेड, ऑक्सिजन, उपचार, न परवडणारा खर्च यांचा विचार करून गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, संतकृपा उद्योगसमूह यांनी एकत्र आळजापूर येथील पवार मळा जिल्हा परिषद शाळेत पंधरा बेडची सोय केली आहे. या ठिकाणी वाफारा मशीन, सॅनिटायझर, चहा, नाष्टा, दोनवेळचे जेवण व प्राथमिक आरोग्य कर्मचारी, अधिकारी भेट, आशा, अंगणवाडी सेविका भेट देऊन रुग्णांची देखभाल करणार आहेत.
विलगीकरण कोरोना सेंटरचे उदघाटन बिबी प्राथमिक
आरोग्य केंद्रांचे डॉ. संदीप खताळ, फलटण तालुका राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, आळजापूरचे सरपंच दिलीप नलवडे, शिवशक्ती उदयोग समुहाचे प्रमुख व पोलीस पाटील शंकरराव नलवडे, फलटण तालुका दूध संघाचे सचिव तुकाराम नलवडे, जालिंदर नलवडे, शुभम नलवडे, चंद्रकांत पवार, ग्रामसेवक आनंदराव गुरव, अशोक पवार, अतुल शिंदे, मनोज नलवडे, ऋतुराज नलवडे, विशाल पवार, अविनाश केंजळे, संतोष पवार, श्रीधर नलवडे यांच्यासह कोरोना व्यवस्थापन कमिटीचे सदस्य, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
फोटो सूर्यकांत निंबाळकर यांनी पाठविला आहे.
आळजापूर येथे विलगीकरण कोरोना सेंटरचे उदघाटन डॉ. सदिप खताळ यांच्या हस्ते झाले. यावेळी विलास नलवडे, सरपंच दिलीप नलवडे, शंकरराव नलवडे, तुकाराम नलवडे उपस्थित होते. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)