औंध ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:52+5:302021-06-19T04:25:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंध : औंध परिसरातील सुमारे १५ ते २० गावांतील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात कोरोना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : औंध परिसरातील सुमारे १५ ते २० गावांतील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात कोरोना आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच सोनाली मिठारी व उपसरपंच दीपक नलवडे यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणी केंद्र औंधमध्ये सुरू व्हावे, अशी मागणी औंध ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी लावून धरली होती. ही चाचणी करण्यासाठी पुसेसावळी तसेच अन्य ठिकाणी जावे लागत होते. शुक्रवारपासून औंध ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी सुरू करण्यात आली असून, यामुळे रुग्णांची ससेहोलपट थांबणार आहे. परिसरातील नागरिकांनी लक्षणे दिसताच वेळीच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपसरपंच दीपक नलवडे यांनी केले आहे.