साताऱ्यातील दोन केंद्रांवर ३३० नागरिकांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:41+5:302021-07-07T04:47:41+5:30
सातारा : जिल्हा परिषद, सातारा पालिका व पुणे येथील जीविका संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे सोमवारी लसीकरण शिबिर पार ...
सातारा : जिल्हा परिषद, सातारा पालिका व पुणे येथील जीविका संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे सोमवारी लसीकरण शिबिर पार पडले. शहरातील दोन केंद्रांवर ४५ वर्षांवरील ३३० नागरिकांना कोरोनो लस देण्यात आली.
गुरुवार पेठ येथील समाजमंदिरात सकाळी दहा वाजता सातारा पालिकेचे विरोधी पक्षनेता अशोक मोने, आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ झाला. शिबिरात ६४ पुरुष, तर ८६ महिला अशा एकूण १५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. मेघा अनुगडे, इर्शाद तांबोळी, सूरज माने, रूपाली जाधव, अमृता निपाणे, आशा सेविका स्वाती खर्शीकर, माधवी साळुंखे यांनी परिश्रम घेतले.
मंगळवार पेठेतील पोळ वस्ती समाजमंदिरातही नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिर पार पडले. याठिकाणी ७८ पुरुष, तर १०२ महिला अशा १८० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. डॉ. वीणा काकडे, गौरव जाधव, महेश पवार, रसिका पवार, रेश्मा कांबळे, मिलिंद पोळ, भारत पोळ, कमलाकर पोळ, संगीता पोळ, कमल पोळ, रोहिणी पवार, लक्ष्मीबाई चौगुले यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.