कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:37+5:302021-03-10T04:38:37+5:30
माजी विद्यार्थी मेळावा कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात १९८१ साली असलेल्या वाणिज्य विभागातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. प्राचार्य ...
माजी विद्यार्थी मेळावा
कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात १९८१ साली असलेल्या वाणिज्य विभागातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. प्राचार्य विठ्ठलराव लिपारे, युवराज लांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्राचार्य मोहन राजमाने, माजी प्राचार्य विठ्ठलराव लिपारे, युवराज लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. हनुमंत भाग्यवंत यांनी प्रास्ताविक केले. अशोक शिर्के यांनी आभार मानले.
कचऱ्याचे ढीग
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
रामापूर : पाटण येथील तहसील कार्यालयात दुचाकीची पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे. तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी अस्तव्यस्त लावल्या जातात. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील पार्किंगबाबत कोणीही उपाययोजना करीत नाही.
दुभाजकात गवत (फोटो : ०९इन्फो०२)
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. दुभाजकातील झाडे वाळली आहेत, तर गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.