कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित : बाळासाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:11+5:302021-04-22T04:40:11+5:30
तांबवे : ‘कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित ...
तांबवे : ‘कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. ४५ वर्षांवरील सर्वांनी लस घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येथील आरोग्य उपक्रेंद्रामार्फत कोरोना लसीकरण करण्यात आले. त्यास पालकमंत्री पाटील यांनी भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा केली. प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, निवासी नायब तहसीलदार आनंदराव देवकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, सुपने आरोग्य केंद्राच्या डॉ. स्नेहा हुंदरे, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, निवासराव पाटील, अण्णासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, शंकर पाटील, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, तलाठी ढवन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील यांनी लसीकरण केंद्रावर भेट देऊन तेथील डॉक्टर, कर्मचारी यांना काही अडचणी आहेत का याची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या अनेक ज्येष्ठ ग्रामस्थांची, महिलांची आस्थेवाईकपणे चौकशी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.