केंजळमध्ये १८०, सुरूरमध्ये २०० नागरिकांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:11+5:302021-04-13T04:37:11+5:30
वेळे : वाई तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असून केंजळमध्ये १८० तर सुरूरमध्ये २०० जणांना लस देण्यात आली. ...
वेळे : वाई तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असून केंजळमध्ये १८० तर सुरूरमध्ये २०० जणांना लस देण्यात आली. कोरोना लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे.
केंजळ गावातील १८० ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. लसीकरण माेहीम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका तसेच सर्व आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, अंगणवाडीसेविका, मदतनीस, तलाठी व सोसायटीचे सचिव, शिवकृपा पतपेढीचे संचालक दीपक येवले यांनी सहकार्य केले.
यावेळी या सर्वांना ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायजरच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, सदस्य नीलेश जगताप, बाळासाहेब येवले, ग्रामसेवक संकपाळ तसेच वाई बाजार समितीचे संचालक कुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप व जयंत येवले उपस्थित होते.
दरम्यान, सुरूर येथेही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणास प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात २०० लोकांसाठी लस उपलब्ध होती. यावेळी सरपंच शैला काळे, उपसरपंच नारायण चव्हाण, सदस्य अविनाश चव्हाण, अश्विन चव्हाण, कैलास बागल, सुरेखा चव्हाण, अनिता चव्हाण, मेघा सोनटक्के, हेमलता चव्हाण, शकील मोकाशी, नीलम चव्हाण, ग्रामसेवक डी. के. जाधव, तलाठी मोहन जाधव, मंडलाधिकारी संतोष जाधव, पोलीस पाटील निर्मला पवार, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शिक्षण विभाग, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स आदींनी मोलाची कामगिरी बजावली.