कऱ्हाडात चार रुग्णालयांत मिळणार कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:19+5:302021-03-04T05:14:19+5:30
गजानन महाराज प्रकट दिन उत्सव कोरोनामुळे रद्द कऱ्हाड : मलकापूर येथे संत गजानन महाराज मंदिरात शुक्रवारी (दि. ५ मार्च) ...
गजानन महाराज प्रकट दिन उत्सव कोरोनामुळे रद्द
कऱ्हाड : मलकापूर येथे संत गजानन महाराज मंदिरात शुक्रवारी (दि. ५ मार्च) १४३ वा गजानन महाराज प्रकट दिन उत्सव साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती गजानन महाराज मंदिर समितीने दिले आहे. गत काही दिवसांपासून कऱ्हाड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मलकापूरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तारळे विभागात आढळला कोरोनाबाधित रुग्ण
पाटण : पाटण तालुक्यातील तारळे येथे चाळीस वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हाभरात कोरोना आणि हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तारळे येथील ग्रामस्थांना वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या भीतीने लोक भयभीत झाले आहेत. सध्या ढोरोशी येथील महिला कोरोनाबाधित झाली आहे. त्यामुळे विभागात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. आठवडी बाजारात ग्रामपंचायत व पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
सुरेखा वायदंडे-चव्हाण यांची निरीक्षकपदी निवड
कऱ्हाड : आगाशिवनगर-मलकापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका सुरेखा वायदंडे चव्हाण यांची दिल्ली येथील मानव संरक्षण समितीच्या जिल्हा महिला निरीक्षकपदी निवड झाली आहे. मानव संरक्षण समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुऱ्हाडे व महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक राज्य जनसंपर्क अधिकारी भगत यांच्या आदेशानुसार समितीचे राज्य युवा अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी ही निवड केली. सुरेखा चव्हाण यांनी गत तेवीस वर्षे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी संतोष पाटील व महिला प्रमुख माधुरी उदावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.