corona virus : सातारा जिल्ह्यात दिवसात आणखी २५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:04 PM2020-09-10T19:04:32+5:302020-09-10T19:06:34+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. आतापर्यंतचा बळींचा हा दुसऱ्यांदा उच्चांकी आकडा आहे. यामुळे बळींचा आकडा आता ५८३ वर पोहचला आहे.
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. आतापर्यंतचा बळींचा हा दुसऱ्यांदा उच्चांकी आकडा आहे. यामुळे बळींचा आकडा आता ५८३ वर पोहचला आहे.
जिल्हात बुधवारी रात्री ८१७ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यात २५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये साताऱ्यातील कामाठीपुरा येथील ४३ वर्षीय महिला, कुसवडे सातारा येथील ४४ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ६० वर्षीय महिला, शाहुनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील ५५ वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील ८३ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ५८ वर्षीय पुरुष. चीचणी येथील ४२ वर्षीय महिला, अंबेरी कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, चाळकेवाडी सातारा येथील ४८ वर्षीय महिला, वडूज खटाव येथील ७० वर्षीय महिला, राऊतवाडी कोरेगाव येथील ५४ वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील ८५ वर्षीय पुरुष या मृतांचा समावेश आहे.
कोल्हापूर नाका कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, कुंभारगाव पाटण येथील ७५ वर्षीय पुरुष, अपशिंगे सातारा येथील ६२ वर्षीय पुरुष, कोळेश्वर कराड येथील ७८ वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील २८ वर्षीय पुरुष, कार्वे नाका कराड येथील ६७ वर्षीय पुरुष, बेलवडे बु येथील ८२ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील ५८ वर्षीय पुरुष, औंध येथील ४५ वर्षीय पुरुष, वाजेगाव खानापूर येथील ३९ वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील ३० वर्षीय पुरुष, कराड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ३४७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ हजार कोरोनामुक्त झाले आहेत.