corona virus Goa Border : गोव्यात कामाला जाणाऱ्यांना दिलासा, ई पासची अट रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 12:10 PM2021-04-26T12:10:34+5:302021-04-26T12:21:25+5:30
CoronaVIrus Goa Sindhudurg Border : गोव्यात कामासाठी जाणार्या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही.पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यांना सुट देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तहसिलदार राजाराम म्हात्रे बैठक घेऊन तशा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे.
सावंतवाडी :गोव्यात कामासाठी जाणार्या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही.पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यांना सुट देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तहसिलदार राजाराम म्हात्रे बैठक घेऊन तशा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे. याबाबत चा तोडगा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलून काढला तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही राऊळ यांच्या तोडग्याला मान्यता दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात युवक युवती गोव्यात रोजगार तसेच शिक्षणासाठी जातात मात्र गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्याप्रमाणात मिळत आहेत.त्याचा प्रसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी ई पास ची अट घातली होती पण या अटी मुळे गोव्यातून येणाऱ्या ना मोठा फटका बसल्याने सर्वच राजकीय पक्ष आपल्या परीने तोडगा काढत आहेत.
त्याप्रमाणेच तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी गोव्यात जाणाऱ्यासाठी ई-पासची अट तात्पुरती रद्द केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यामधून सुट देण्यात आली आहे.तसेच नंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे.
यासाठी राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली तसेच त्यानंतर पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही पालकमंत्री सामंत यांच्या आदेशाला अनुकूलता दर्शविली असून तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी ही आपण आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांची बैठक घेऊन या युवक युवतीना ग्रामपंचायत च्या माध्यमातून पत्र तर कामावरील ओळखपत्र दाखवल्यानंतर सोडण्यात येणार आहे.यामुळे गोव्यात जाणाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
पालकमंत्र्यासह खासदारांकडून पाठपुरावा
सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी ई पासची अट रद्द व्हावी यासाठी प्रशासनाशी चर्चा करत असतनाच पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी यातून तोडगा काढला त्यामुळेच हे शक्य झाल्याचे राऊळ यांनी सांगितले