CoronaVirus : जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा ३२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:44 PM2020-06-15T16:44:02+5:302020-06-15T16:45:33+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत असून, शनिवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरू असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून, उपचारादरम्यान त्याचा स्वॅब तपासणीकरिता खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला होता. त्यात तो कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत असून, शनिवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरू असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून, उपचारादरम्यान त्याचा स्वॅब तपासणीकरिता खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला होता. त्यात तो कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे.
हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबईवरून आला होता, अशी माहितीही संबंधित रुग्णालयाने दिली असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा पुणे येथून ८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड यांनी २६ असे एकूण ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण ७२७ झाली असून, कोरोनातून ४९९ बऱ्या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या १९४ इतकी झाली आहे तर ३२ जणांचा मृत्यू झालेला आहे.