corona virus - होम क्वारंटाईनमधून दोघेजण पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:21 PM2020-03-24T12:21:04+5:302020-03-24T12:32:09+5:30
नेपाळहून आलेले दोघेजणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तरीही हे दोघे घरातून निघून गेल्याची घटना कर्नाळ (ता. मिरज) येथे घडली आहे. या दोघांवर सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : नेपाळहून आलेले दोघेजणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तरीही हे दोघे घरातून निघून गेल्याची घटना कर्नाळ (ता. मिरज) येथे घडली आहे. या दोघांवर सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाळ येथे एक नेपाळहून आलेले कुटूंब बऱ्याच वर्षापासून राहते. पती, पत्नी, मुलगा व सून असे चारजणांचे हे कुटूंब आहे. ते गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी या कुटूंबातील दोघेजण नेपाळहून परतले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोघांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यात एक पुरूष व एक महिलेचा समावेश होता.
कुटूंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ग्रामस्थांनीही या कुटूंबाला मदतीचा हात दिला. त्यांना जीवनावश्यक वस्तूही देण्यात आल्या. किमान पंधरा दिवस पुरेल धान्यसाठाही दिला. ग्रामस्थांनी या कुटूंबाला घराबाहेर पडू नका, अशी विनंतीही केली.
तरीही होम क्वारंटाईनमध्ये असलेले दोघेजण रविवारी सकाळी अकरा वाजता घरात मिळून आले नाहीत. या कुटूंबातील महिला इस्लामपूरला तर पुरूष हा इंदापूरला निघून गेले. होम क्वारंटाईनच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी या पिता व मुलगा अशा दोघांवर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.