corona virus : जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी ३१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 06:15 PM2020-09-14T18:15:54+5:302020-09-14T18:16:59+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत गतीने वाढत असून, सोमवारी आणखी ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा ६९० वर पोहोचला आहे. केवळ दोन दिवसांत ६६ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे.
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत गतीने वाढत असून, सोमवारी आणखी ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा ६९० वर पोहोचला आहे. केवळ दोन दिवसांत ६६ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे.
जिल्ह्यात रविवारी रात्री ६२९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. त्यामध्ये वर्णे, ता. सातारा येथील ५६ वर्षीय पुरुष, संगमनगर येथील ५३ वर्षीय पुरुष, राऊतवाडी येथील ७६ वर्षी पुरुष, देशमुखनगर येथील ४७ वर्षीय महिला, चिंचणेर येथील ४८ वर्षीय पुरुष, शाहूपुरी येथील ७६ वर्षीय महिला, दत्तनगर ६० वर्षीय महिला, तारगाव येथील ७३ वर्षीय महिला, सातारा येथील ६४ वर्षीय पुरुष, सातारा येथील ७२ वर्षीय महिला, बेलवडे ता. कऱ्हाड येथील ८० वर्षीय पुरुष, ल्हासुर्णे कोरेगाव येथील ६९ वर्षीय पुरुष, कोपर्डे कऱ्हाड येथील ७० वर्षीय पुरुष, तांबवेवाडी कोरेगाव येथील ४५ वर्षीय महिला, कऱ्हाड येथील ५५ वर्षीय पुरुष, विसापूर, ता. खटाव येथील ४५ वर्षीय पुरुष, येरळवाडी, ता. खटाव ७६ वर्षीय पुरुष, दारुज, ता. खटाव येथील ६७ वर्षीय पुरुष, निनाम पाडळी सातारा येथील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शाहूपुरी रोड सातारा येथील ५६ वर्षीय पुरुष, घिगेवाडी, ता. कोरेगाव येथील ७५ वर्षीय महिला, पाडळी, ता. सातारा येथील ६३ वर्षीय महिला, सातारा येथील ६३ वर्षीय पुरुष, कऱ्हाड येथील ७० वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील ७३ वर्षीय पुरुष, शालगाव, ता. कडेगाव येथील ८५ वर्षीय पुरुष, संगमेशनगर फलटण येथील ६१ वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील ७२ वर्षीय महिला, तारळे, ता. पाटण येथील ७२ वर्षीय पुरुष, मलकापूर कऱ्हाड येथील ६५ वर्षीय पुरुष, किन्हई, ता. कोरेगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ५७८ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर १४ हजार ८३३ जणांना घरी सोडण्यात आले आहे.