corona virus-साताऱ्यात कोरोनाचे पाच संशयित; विलगीकरण कक्षात केले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 02:03 PM2020-03-23T14:03:05+5:302020-03-23T14:05:14+5:30

कोरोनाची संशयितांची संख्या आता वाढत असून, एका दिवसात साताऱ्यात पाच कोरोनाचे संशयित दाखल झाले आहेत. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

corona virus - Five suspects of corona in the morning; Filed in separation cell | corona virus-साताऱ्यात कोरोनाचे पाच संशयित; विलगीकरण कक्षात केले दाखल

corona virus-साताऱ्यात कोरोनाचे पाच संशयित; विलगीकरण कक्षात केले दाखल

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात कोरोनाचे पाच संशयितविलगीकरण कक्षात केले दाखल

सातारा : कोरोनाची संशयितांची संख्या आता वाढत असून, एका दिवसात साताऱ्यात पाच कोरोनाचे संशयित दाखल झाले आहेत. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेल्या २७ वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा २४ वर्षीय मित्रालाही सर्दी व खोकला असल्याने त्यांना दि. २१ मार्च रोजी रात्री अकरा वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेल्या २४ वर्षीय युवकाचा घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री एक वाजता विलगीकरण कक्षात दाखल केले.

दरम्यान, शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चिली येथून आलेल्या २४ वर्षीय युवकास व रात्री दहा वाजता दुबई येथून आलेल्या २९ वर्षीय युवकास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोना संशितांची संख्या आता पाच झाली आहे. पाचही रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Web Title: corona virus - Five suspects of corona in the morning; Filed in separation cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.