corona virus :जिल्ह्यात आणखी नऊजणांचा बळी, चिंता वाढली; मृतांचा आकडा ३१५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 06:44 PM2020-08-24T18:44:43+5:302020-08-24T18:45:56+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी नऊजणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३१५ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४४३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.

corona virus: Nine more killed in district, anxiety rises; Death toll rises to 315 | corona virus :जिल्ह्यात आणखी नऊजणांचा बळी, चिंता वाढली; मृतांचा आकडा ३१५ वर

corona virus :जिल्ह्यात आणखी नऊजणांचा बळी, चिंता वाढली; मृतांचा आकडा ३१५ वर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी नऊजणांचा बळीचिंता वाढली; मृतांचा आकडा ३१५ वर

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी नऊजणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३१५ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४४३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, कराड तालुक्यातील हरपळवाडी १, ओंड २, कराड १२, हजारमाची ३, आगाशिवनगर २, मसुर १, सावडे २, वाठार २, जुलेवाडी १, मंगळवार पेठ २, खोडशी १, मलकापूर १,शनिवार पेठ १, राजाचे कुर्ले १, कोयना वसाहत १, कोडोल १, शनिवार पेठ २, रविार पेठ १, वडगाव हवेली १, आनंदकाले १, गुरुवार पेठ १, वाघेरी १, मंगळवार पेठ १, बेलमाची १, होटेवाडी १,उंडाळे १, शुक्रवार पेठ १, मंगळवार पेठ २, बनवडी २, कराड १, पाल १, किवळ २, बेलवडे बु ३, बनवडी ३, कोपर्डे हवेली १, शनिवार पेठ ३, उपजिल्हा रुग्णालय १, गोवारे १, हजारमाची १, आगाशिवनगर ३, मलकापूर २, रेठरे बु १.

सातारा तालुक्यातील सातारा ३, विलासपूर ४, नागठाणे १, केसरकर कॉलनी १, आंबेदरे ३, राजेवाडी निगडी ८१, क्षेत्रमाहुली २, सासपडे १, धामणी १ सिंबेवाडी १, सुपुगडेवाडी १, रामशेटेवाडी १, भोसगाव २, भातमारली १, शनिवारपेठ १, बजाज कॉलनी माहुली १, मंगळवार पेठ १, सातारा १, रविवार पेठ ५, खेड १, आबाचीवाडी १, यादोगोपाळपेठ १, कारंडवाडी ३, करंजेपेठ ४, पळशी २, बोरगांव १, सदरबझार १, शुक्रवारपेठ १, विसावा नाका १, कोंडवे १, शाहुपुरी १, सातारा १, गोडोली १, अतीत १, पळशी ५, सम्राटनगर १, मंगळवार पेठ १, कोडोली १, शनिवार पेठ १ , करंजे १, रविवार पेठ १, केसरकर पेठ १, शाहुपुरी २, सातारा १, शिवथर १, कोंढवे १, धोंडेवाडी १, अमृतवाडी१, गुरुवार पेठ १, नागठाणे १, खोडद ९, नागठाणे ३, अतित ४ , सासपडे ६, अपशिंगे ४, सामेवार पेठ १, मल्हारपेठ १, कोंडवे १, संगमनगर १, किन्ही १, सातारा १, केसरकर पेठ १, करंजे १, कुमठे १, एमआयडीसी १, मंगळवार पेठ ३, सदरबझार २, सातारा २, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ १, सिटीपोलीस लाईन १, सातारा १.

खटाव तालुक्यातील मायणी २, पुसेसावळी ३, येनकुळ १, नांदोशी २, बुध २, विसापूर १, औंध २, पुसेगाव १, नेर ४, वडूज १, राजापुर १, खटाव ४, विसापुर २, औंध १, भोसले २, डिस्कळ २, पुसेसावळी १, वेटणे १, येळीव १. कोरेगांव तालुक्यातील सातारा रोड ४, भक्तवडी १, चिमणगांव ४, रेवडी १, बोलेवाडी १, पिंपोडे बु ८, आंबवडे १, महाडवेनगर १.
फलटण तालुक्यातील फलटण १, कोळकी १, अलगुडेवाडी १, धुळदेव १, मंगळवार पेठ १, तरडगाव १.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर ५ , माण तालुक्यातील पळसावडी १, म्हसवड १, वाडी १, म्हसवड १८, स्वरुपखानवाडी ३, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी २,पाटण १, खांडववाडी २. खंडाळा तालुक्यातील शिरवळ ३, केसुर्डी १, लोणंद ७, संभाजी चौक १, सुखेड १, हराळी १, अजनुज १, भादे ३, जावले १, शिंदेवाडी १, शिवाजीनगर २.

वाई तालुक्यातील भुईंज ३, सुरुर १ , उडतारे ६, वेलंग ४, पाचवड ४, आसले ३, शेलारवाडी ४, वहागांव ३, वाई १, बावधन ६, कवठे २, सोनगीरवाडी १, पाचवड १, दह्याट १, बावधन नाका १, यशवंतनगर १, उडतारे १, जांभ १ तसेच इतर ४ आणि जाधववाडी येथे १ रुग्ण आढळून आला.

साताऱ्यातही मृतांचा आकडा वाढतोय

जिल्ह्यात सोमवारी नऊ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ओंड, ता. कराड येथील ५१ वर्षीय पुरुष, सोळशी, ता. कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील ७८ वर्षीय महिला, चोरे, ता. कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, तामाजाई नगर सातारा येथील ३६ वर्षीय पुरुष, बनवडी, ता. कराड येथील ७९ वर्षीय पुरुष, विक्रमनगर पाटण येथील ६५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील ७१ वर्षीय पुरुष, तासगाव, ता. सातारा येथील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 

Web Title: corona virus: Nine more killed in district, anxiety rises; Death toll rises to 315

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.