corona virus : झेडपीमधील कोरोना बाधित कर्मचारी संख्या ७०० पार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:44 PM2020-11-09T12:44:57+5:302020-11-09T12:48:48+5:30

Coronavirus, zp, satara, hospital सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून बाधित आकडा ७१२ झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत १३ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, ६३३ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

corona virus: The number of corona infected employees in ZP has crossed 700 ... | corona virus : झेडपीमधील कोरोना बाधित कर्मचारी संख्या ७०० पार...

corona virus : झेडपीमधील कोरोना बाधित कर्मचारी संख्या ७०० पार...

Next
ठळक मुद्देझेडपीमधील कोरोना बाधित कर्मचारी संख्या ७०० पार... आणखी एकाचा मृत्यू : आतापर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी

सातारा : जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून बाधित आकडा ७१२ झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत १३ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, ६३३ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावांबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य आदी विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ७१२ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा तालुक्यात कार्यरत १३३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाड मध्ये ११३, कोरेगाव ११३, खटाव ६३, खंडाळा ३२, जावळी २७, पाटण ७८, फलटण ४४, महाबळेश्वर ३३, माण २८ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्यां ४८ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आणखी एका कर्मचाºयाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा १३ वर पोहोचला आहे.

आतापर्यंत पाटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी तिघां कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर सातारा व फलटण तालुक्यात कार्यरत प्रत्येकी २ आणि कोरेगाव तालुक्याचा एकाचा मृत्यू झाला. तसेच जावळी तालुक्यात आणखी एका कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेल्याने मृतांची संख्या दोनवर गेली आहे.

कोरोनावर ६३३ जणांची मात...

जिल्हा परिषदेच्या ७१२ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ६३३ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १०० जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १२४, पाटण ६८, कऱ्हाड  १०८, महाबळेश्वर ३३, खटाव ४६, वाई ४३, फलटण ३४, खंडाळा २९, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: corona virus: The number of corona infected employees in ZP has crossed 700 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.