इतर गावाच्या तुलनेत कोरोना योद्धयांचे काम चांगले : वैभव चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:43 AM2021-09-21T04:43:21+5:302021-09-21T04:43:21+5:30
कोपर्डे हवेली : ‘ कोरोनाच्या काळात गावातील अनेक घटकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी इतर गावाच्या तुलनेत योद्धयांसारखे काम केल्यानेच कोरोना ...
कोपर्डे हवेली : ‘ कोरोनाच्या काळात गावातील अनेक घटकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी इतर गावाच्या तुलनेत योद्धयांसारखे काम केल्यानेच कोरोना रोखण्यासाठी आपण यशस्वी ठरलो. अजूनही काळजी घेणे महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन वैभव चव्हाण यांनी केले.
कोपर्डे हवेली येथील बालवीर समाज सेवा मंडळाने आयोजित कार्यक्रमात कोरोना योद्धयांना सन्मान पत्र, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते एस. डी. चव्हाण, एस. व्ही. चव्हाण, माजी पोलीस पाटील प्रल्हाद पाटील, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. अमित जाधव, डॉ. उत्कर्षा साळुंखे, डॉ. मयुरेश चव्हाण, एम. आय. मुल्ला, मंडळांचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण, भरत साळवे, आरोग्य सेवक संदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, डी. एस. काशिद, सीमा साळवे, कॉ. गणेश चव्हाण, शरद चव्हाण, विजय चव्हाण, किशोर साळवे उपस्थित होते.
यावेळी एस. व्ही. चव्हाण यांनी बालवीर समाज सेवा मंडळाची साठ वर्षांतील सामाजिक कार्यांचा आढावा सांगितला. यावेळी विजय चव्हाण, शिवाजी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र काशीद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन चव्हाण यांनी प्रास्तविक केले. भरत साळवे यांनी आभार मानले.
कोपर्डे हवेली येथील कोरोना योद्धयांचा सत्कार डॉ. वैभव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, डॉ. सचिन चव्हाण उपस्थित होते.