नवयुवक गणेश मंडळातर्फे कोरोना योद्ध्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:28+5:302021-09-26T04:42:28+5:30

सातारा : सातारारोड, ता. कोरेगाव येथील कालिदास काॅलनीतील नवयुवक गणेश मंडळातर्फे कोरोना महामारीत जीवाची बाजी लावून आदर्श कामगिरी केलेल्या ...

Corona warriors honored by Navyuwak Ganesh Mandal | नवयुवक गणेश मंडळातर्फे कोरोना योद्ध्यांचा गौरव

नवयुवक गणेश मंडळातर्फे कोरोना योद्ध्यांचा गौरव

Next

सातारा : सातारारोड, ता. कोरेगाव येथील कालिदास काॅलनीतील नवयुवक गणेश मंडळातर्फे कोरोना महामारीत जीवाची बाजी लावून आदर्श कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व सहकारी, ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर्स, पत्रकार व आशा स्वयंसेविका यांचा कोरोनायोद्धा म्हणून गुलाबपुष्प व शिवछत्रपतींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात जीवाची बाजी लावून कोरोना योद्धे यांनी मोलाची जबाबदारी व कार्य केले आहे. त्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवयुवक गणेश मंडळ, कालिदास कॉलनी सातारारोड यांनी १९ सप्टेंबर रोजी सातारारोड पंचक्रोशीमधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. आकर्षक गणेश मूर्तीशेजारी कोरोना योद्धा देखावा सादर करण्यात आला होता. सातारारोड पोलीस दूरक्षेत्राच्या सहायक पोलीस निरीक्षक आर. के. शिंदे यांचा येथील वृत्तपत्र विक्रेत्या सुजाता अनंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचा महेंद्र सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, नवयुवक गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कालिदास कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी केदार साखरे यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच प्रताप पवार, जलसंधारण टीमचे सुरेश फाळके, दशरथ फाळके, ग्रामपंचायत सदस्य, डॉ. साळवी, डॉ. माने, आशा स्वयंसेविका, महिला व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

फोटो २५सातारारोड

सातारारोड येथे सहायक पोलीस निरीक्षक आर. के. शिंदे यांचा वृत्तपत्र विक्रेत्या सुजाता पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संतोष साळुंखे उपस्थित होते.

Web Title: Corona warriors honored by Navyuwak Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.