मलकापुरात कोरोनाबाधित रुग्णदर केवळ ०.७ टक्क्यावर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:39 AM2021-09-19T04:39:26+5:302021-09-19T04:39:26+5:30

कोरोनामुक्ती दरात वाढ होऊन ९६.६ टक्क्यावर, मृत्यूदर २.७ टक्क्यावर स्थिर लोकमत न्यूज नेटवर्क माणिक डोंगरे मलकापूर : मलकापुरात आत्तापर्यंत ...

Coronary artery disease rate in Malkapur is only 0.7 per cent; | मलकापुरात कोरोनाबाधित रुग्णदर केवळ ०.७ टक्क्यावर;

मलकापुरात कोरोनाबाधित रुग्णदर केवळ ०.७ टक्क्यावर;

Next

कोरोनामुक्ती दरात वाढ होऊन ९६.६ टक्क्यावर,

मृत्यूदर २.७ टक्क्यावर स्थिर

लोकमत न्यूज नेटवर्क

माणिक डोंगरे

मलकापूर : मलकापुरात आत्तापर्यंत ३ हजार १२२ जण कोरोनाबाधित झाले. त्यापैकी ३ हजार ०१६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली; तर ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृत्यूदर २.७ टक्क्यावर स्थिर राहिला आहे. सक्रिय रुग्णसंख्येच्या दरात कमालीची घट होऊन केवळ ०.७ टक्क्यावर आला आहे. त्यामुळे शहराचा कोरोना मुक्तीदर वाढून ९६.६ टक्क्यावर गेला आहे. योग्य नियोजनामुळे मलकापूर शहर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

मलकापुरात पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहराला कोरोनामुक्त केले होते. मात्र एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला होता. गेली पंधरा महिने शहरात टप्प्या-टप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर २०२० या दोन महिन्यांत तर कोरोनाने कहर केला होता. ऑक्टोबर महिन्यापासून बाधितांची संख्या कमीकमी होत गेली. नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी २-३ जण, तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडले होते.

शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली, तरी बाधित होण्याचे थांबलेले नव्हते. जानेवारी २०२१ पासून पुन्हा वाढ होत गेली. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांत १११ रुग्ण वाढले. एप्रिल महिन्यात तब्बल ४५३ बाधित सापडले. मे महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच राहिला. ११ जूनअखेर ३५ दिवसांत तब्बल ५९२ जण बाधित सापडले होते. १० जुलैअखेर मे आणि जून महिन्याच्या तुलनेत थोडासा दिलासा मिळाला असला, तरी ३३० जण बाधित सापडले; तर १० ऑगस्टपर्यंत या महिन्यातही ३७५ रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन एका महिन्यात केवळ १७० बाधित सापडले, तर फक्त चारजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

चौकट

१६ महिन्यांचा लेखाजोखा

२२ एप्रिल ते २४ मे ३१

२५ मे ते २५ जून ०

२६ जून ते २६ जुलै ४३

२७ जुलै ते २६ ऑगस्ट ३३८,

२७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर ४२८,

२७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबला १५९

२८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर ६९

२८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर १८

३१ डिसेंबर ते ३० जानेवारी १५

३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी १९

१ मार्च ते २ एप्रिल ७७

३ एप्रिल ते ६ मे ४५३

७ मे ते ११ जून ५९२

११ जून ते १० जुलै ३३०

११ जुलै ते १२ ऑगस्ट ३७५

१३ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर १७०

चौकट

मलकापुरात सक्रिय रुग्ण शंभरीपार

एकूण- ३१२२,

मृत्यू - ८४,

घरी सोडले - ३०१६,

उपचारार्थ - २२

रुग्णालयात - ५,

होम आयसोलेट - १७

Web Title: Coronary artery disease rate in Malkapur is only 0.7 per cent;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.