अवैज्ञानिक प्रयोगानेच कोरोनाची भयावह परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:07+5:302021-05-31T04:28:07+5:30

मायणी : ‘गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी झुंज देत आहोत. यावर्षी कोरोनावरील लस उपलब्ध झाली. मात्र, दुर्दैवाने लसीकरणात अनेक ...

Corona's dire situation due to unscientific experiment | अवैज्ञानिक प्रयोगानेच कोरोनाची भयावह परिस्थिती

अवैज्ञानिक प्रयोगानेच कोरोनाची भयावह परिस्थिती

Next

मायणी : ‘गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी झुंज देत आहोत. यावर्षी कोरोनावरील लस उपलब्ध झाली. मात्र, दुर्दैवाने लसीकरणात अनेक चुका झाल्या. गतवर्षीच लसीकरणाचा विचार करणे गरजेचे होते. मात्र, आपल्या सरकारने टाळी वाजवा, थाळी वाजवा, दिवे लावा, असे अवैज्ञानिक प्रयोग केल्याने देशात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मायणी (ता. खटाव) येथे यशवंत शिक्षण संस्थेच्या कोविड सेंटरचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी हरणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, मायणी येथील मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष विवेक देशमुख, सरपंच सचिन गुदगे, माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख, प्रकाश कणसे व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार येळगावकर म्हणाले, मायणी येथील कोविड सेंटरमध्ये खटाव तालुक्यातील व मायणी परिसरातील रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे या रुग्णांना अन्य ठिकाणी पर्याय शोधावे लागतात. तसेच त्याठिकाणी बाऊन्सर नेमले आहेत. याउलट याठिकाणी तज्ज्ञ व होतकरू डॉक्टर आहेत, त्यामुळे या कोविड सेंटरचा परिसरातील रुग्णांना फायदा होईल.

या कार्यक्रमाला प्रांताधिकारी जनार्दन कासार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इनुस शेख, वैद्यकीय अधिकारी सुशील तुरुकमाने, पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, डॉ. सुशांत देशमुख, डॉ. सागर खाडे, डॉ. उदय माळी, डॉ. सोमनाथ कुंभार, डॉ. नीलेश देशमुख, आदी उपस्थित होते.

३० मायणी

मायणी येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

Web Title: Corona's dire situation due to unscientific experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.