पडवळवाडीत कोरोनाचा कहर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:07+5:302021-05-06T04:41:07+5:30
ढेबेवाडी : पडवळवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) येथे तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आयोजित कोविड तपासणी कॅम्पमध्ये (रॅपिड टेस्ट) सुरुवातीला ...
ढेबेवाडी : पडवळवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) येथे तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आयोजित कोविड तपासणी कॅम्पमध्ये (रॅपिड टेस्ट) सुरुवातीला ६ घरातील १६ नागरिक तपासले. त्यापैकी आठजण कोरोनाबाधित सापडले आणि आरोग्य यंत्रणा हादरली. आता सगळी पडवळवाडी कंटेन्मेंट करून प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.
पडवळवाडी येथील एका व्यक्तीचा मुंबई येथे कोरोनाने मृत्यू झाला होता. नंतर त्याचे नातेवाईक गावी आले; पण त्यांनी स्वतःची टेस्ट केली नव्हती व विलगीकरणातही नव्हते. मात्र त्यांना सर्दी, पडसे असा त्रास सुरू झाल्याचे समजल्यावर तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने पडवळवाडी येथे रॅपिड तपासणी सुरू केली तेव्हा ते कुटुंब आणि त्यांच्या शेजारील घरापासून सुरुवात करून ६ कुटुंबातील १६ नागरिकांची तपासणी केली तेव्हा त्यापैकी आठजण बाधित सापडल्याने आरोग्य विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ हादरून गेले आहेत. रॅपिड टेस्टसाठी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोंजारी, आरोग्य कर्मचारी कांबळे, रोहित भोकरे, आशा सेविका मनीषा शिंदे, आरोग्य सेवक जामसिंग पावरा, स्वप्नील कांबळे, विजय फाळके व पोलीसपाटील अमित शिंदे यांनी तपासणीत सहभाग घेतला होता. दरम्यान, या सर्वांना स्वतंत्र होम आयसोलेशन केले असून, सर्व वसाहत कंटेन्मेंट करून लाॅक केली आहे.