माण तालुक्यातील स्पीचवरील कोरोनाचा परफॉर्मन्स कमी झाल्याने बाधितांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:42+5:302021-05-19T04:40:42+5:30

माण तालुक्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या १३३४ आहेत; तर आजवर माण तालुक्यात एकूण बाधित ९९२४ संख्या आहे. आजवर २२७ मृत्यू ...

Corona's performance on the speech in Maan taluka decreased and the number of victims decreased | माण तालुक्यातील स्पीचवरील कोरोनाचा परफॉर्मन्स कमी झाल्याने बाधितांची संख्या घटली

माण तालुक्यातील स्पीचवरील कोरोनाचा परफॉर्मन्स कमी झाल्याने बाधितांची संख्या घटली

Next

माण तालुक्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या १३३४ आहेत; तर आजवर माण तालुक्यात एकूण बाधित ९९२४ संख्या आहे. आजवर २२७ मृत्यू झाले आहेत. कोरोनावर ७६६३ जणांनी यशस्वी मात केली आहे; तर सध्या १३३४ रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. माण तालुक्यात चार खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात; तर शासकीय व लोकसहभागातून डीसीएच ३, डीसीएचसी ४ केंद्रांवर १४८ बाधित रुग्ण, सीसीसी सेंटरवर १५६ रुग्ण आहेत; तर होम आयसोलेशनमध्ये ९३९ रुग्ण आहेत. एकूण १३३४ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.

माण तालुक्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात १३७ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत; तर खासगी हॉस्पिटलमध्ये ४५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. एवढे ऑक्सिजन बेड उपलब्ध असूनही अतिगंभीर माण तालुक्यातील अनेक रुग्ण मायणी मेडिकल कॉलेज, कऱ्हाड, सातारा, पुणे, अकलूज येथे उपचार घेत आहेत.

खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करताच ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम दिल्यावरच रुग्ण दाखल करून घेतला जातो. मेडिकलचे बिल, लॅबचे बिल लाखात येते. यावर शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने रुग्णांच्या खिशावर राजरोस दरोडा टाकला जात आहे. त्यामुळे खाजगी हॉस्पिटलपेक्षा बाधित रुग्णांची शासकीय कोरोना सेंटरकडे धाव वाढली असून खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कशी लूट होते, याच्या चर्चा पारापारांवर व गल्लोगल्ली होत आहेत. शासकीय कोरोना सेंटरमुळे माण तालुक्यातील दुष्काळी जनतेचे कोट्यवधी रुपये वाचले असून अनेकांचे जीवही वाचले आहेत.

Web Title: Corona's performance on the speech in Maan taluka decreased and the number of victims decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.