कोरोनाचे थैमान हे व्यवस्थेचे अपयश : खंडाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:10+5:302021-04-30T04:50:10+5:30

सातारा : संपूर्ण देशात राज्यात तसेच जिल्ह्यात कोविड-१९ ने मोठे थैमान घातले आहे. शाश्वत आरोग्य सुविधा आपण एकविसाव्या शतकात ...

Corona's Thaman is a failure of the system | कोरोनाचे थैमान हे व्यवस्थेचे अपयश : खंडाईत

कोरोनाचे थैमान हे व्यवस्थेचे अपयश : खंडाईत

Next

सातारा : संपूर्ण देशात राज्यात तसेच जिल्ह्यात कोविड-१९ ने मोठे थैमान घातले आहे. शाश्वत आरोग्य सुविधा आपण एकविसाव्या शतकात पुरवू शकत नाही, हे सर्वच राज्यकर्त्यांचे मोठे अपयश आहे. याचे आत्मपरीक्षण सत्तरीच्या दशकापासून ते आजअखेरच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

यावेळी शासनाने वेळीच कोविड-१९ ची गंभीर दखल घेतली असती तर आज पूर्ण एक वर्ष होत आले तरी संपूर्ण जनतेला वेठीस धरूनच कोविड-१९ ला रोखण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. हीसुद्धा बाब फार गंभीर आहे. आजअखेर एका वर्षातसुद्धा आपण सर्व पेशंटना बेड, ऑक्सिजन, औषध, व्हॅक्सिन देऊ शकलो नाही, हे शासनाचे अपयश आहे.

फक्त लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. शासन फक्त रोजचा बाधित आकडा आणि एकूण आकडे देत आहे; पण रोज पॉझिटिव्हमध्ये उपचारार्थ दाखल असलेले रुग्ण किती, ऑक्सिजन लागणारे किती, व्हेंटिलेटर आवश्यक असलेले रुग्ण किती हे सांगत नाहीत. जर रोजचा डेटा समोर घेऊन केला असता तर आजच्या रोजमरी जीवनापासून जनतेला दिलासा देऊ शकला असता; परंतु राजकीय इच्छाशक्ती कमी असल्याने एकमेकांकडे बोट दाखवण्यात वेळ घालविण्यापेक्षा रुग्ण वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

Web Title: Corona's Thaman is a failure of the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.