Coronavirus: आईविना व्याकूळ मुलं; लॉकडाऊनमुळं दुरावलेल्या आई-लेकरांची तब्बल २९ दिवसांनी घडली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 10:08 AM2020-04-19T10:08:43+5:302020-04-19T10:09:36+5:30
ही भेट केवळ पत्रकार व पोलिस प्रशासनाच्या सहकार्यानेच झाली त्यामुळे पत्रकार व पोलीस यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन विखळेकरांना अनुभवायला मिळाले.
संदीप कुंभार
मायणी : विखळे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील सखाराम मोतीराम कामडी हे आपली पत्नी सुलोचना हे दोघे पती-पत्नी 20 मार्चला नाशिक जिल्ह्यातील मु.हातगड पो. दिसगाव तालुका तळवण येथे लाॅकडाऊनमुळे पडले होते त्यामुळे त्यांची ती मुले आई वडिलांच्या भेटीसाठी व्याकूळ झाली होती.
शोभा देशमुख यांचेकडे सदर तीन मुले पाच सहा दिवस राहिल्यानंतर शोभा देशमुख यांचा मुलगा आल्यानंतर त्यांनी विखळे येथील अंगणवाडी मदतनीस सुप्रिया शरद देशमुख यांच्याकडे सदर मुलांना ठेवली.आई-वडिलांची मुलांपासून ताटातूट झाली होती. याबाबत पत्रकारांनी अग्रेसर भूमिका घेऊन व पोलिस प्रशासनातील मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी,पोलीस निरीक्षक अशोक पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी. महामुनी यांनी प्रयत्न करून नाशिक ग्रामीण पोलिसांमार्फत या कुटुंबाला विखळे येण्याची परवानगी मिळवून दिली
त्यामुळे तब्बल २९ दिवसांनी या लहान मुलांना आपल्या आईवडिलांची भेट घडवून दिली.ही भेट केवळ पत्रकार व पोलिस प्रशासनाच्या सहकार्यानेच झाली त्यामुळे पत्रकार व पोलीस यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन विखळेकरांना अनुभवायला मिळाले.