CoronaVirus : सिव्हिलमध्ये कोरोना बाधित महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 02:09 PM2020-06-12T14:09:31+5:302020-06-12T14:11:10+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी सकाळी आणखी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता ३१ तर बाधितांचा ७०४ वर पोहोचला आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी सकाळी आणखी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता ३१ तर बाधितांचा ७०४ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तर कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शिरवळ, ता. खंडाळा येथील ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा शुक्रवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तसेच महाबळेश्वर तालुक्यातील माचूतरमधील ३० वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला मुंबईवरून प्रवास करून गावी आली होती. सध्या या महिलेला कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे येथून रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये ८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.