CoronaVirus InSatara : धारावीतून आलेल्या मुलीस कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:57 PM2020-05-23T13:57:34+5:302020-05-23T13:58:19+5:30
मुंबईतील धारावी येथून गुरूवारी जिल्ह्यात आलेल्या २१ जणांपैकी एक महिलेला कोरोनाचे निदान झाल्यानंतर शनिवारी दुपारी अजून एका मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ झाली आहे.
सांगली : मुंबईतील धारावी येथून गुरूवारी जिल्ह्यात आलेल्या २१ जणांपैकी एक महिलेला कोरोनाचे निदान झाल्यानंतर शनिवारी दुपारी अजून एका मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ झाली आहे.
गुरूवारी मुंबईतील धारावी परिसरातून २१ जणांनी बसने जिल्ह्यात प्रवेश केला होता. मात्र, इस्लामपूरजवळच त्यांना अडवून त्यांना तपासणीसाठी मिरज कोवीड रूग्णालयात दाखल केले होते. विनापरवाना जिल्ह्यात आल्याने तपासणी नाक्यावरून त्यांची बस परत पाठविण्यात आली होती.
मिरजेत दाखल असलेल्या २१ पैकी १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते तर
एका ३७ वर्षीय महिलेस कोरोना निदान झाले होते. आता शनिवारी एका बारावर्षीय मुलीचाही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.