CoronaVirus Lockdown : पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शिक्षकांना कोरोनाचे काम देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:14 PM2020-05-20T14:14:41+5:302020-05-20T14:16:11+5:30

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही शिक्षकांना विविध प्रकारचे कामकाज सोपविण्यात आले आहेत. ज्या शिक्षकांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा शिक्षकांना कोरोनासंदर्भातले कामकाज देण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.

CoronaVirus Lockdown: Don't give Corona work to teachers over the age of 55 | CoronaVirus Lockdown : पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शिक्षकांना कोरोनाचे काम देऊ नका

CoronaVirus Lockdown : पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शिक्षकांना कोरोनाचे काम देऊ नका

Next
ठळक मुद्देपंचावन्न वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शिक्षकांना कोरोनाचे काम देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी

सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही शिक्षकांना विविध प्रकारचे कामकाज सोपविण्यात आले आहेत. ज्या शिक्षकांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा शिक्षकांना कोरोनासंदर्भातले कामकाज देण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा धोका लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त आहे. त्यामुळे खरबदारीचा उपाययोजना म्हणून ज्यांचे वय पंचावन्नपेक्षा जास्त आहे, अशा शिक्षकांना कामकाज दिले असल्यास त्यांना दिलेले आदेश तत्काळ रद्द करण्यात यावेत. तसेच त्यांच्याजागी पर्यायी व्यवस्था करावी.

कोरोना संदर्भातील कामकाज देताना एका शिक्षकास जास्तीत जास्त पंधरा दिवस कामकाज देण्यात यावे. पंधरा दिवसांपेक्षा जास्त कामकाज देण्यात येऊ नये. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार आहेत. अशा शिक्षकांना त्यांचे ५५ पेक्षा कमी असले तरी कोरोनासंदर्भात कामकाज देण्यात येऊ नयेत.

Web Title: CoronaVirus Lockdown: Don't give Corona work to teachers over the age of 55

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.