खटाव तालुक्यातील ८६ गावांत कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:04+5:302021-05-21T04:42:04+5:30

शेखर जाधव लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची दमछाक होत आहे. खटाव तालुक्यातील ...

Coronavirus patients in 86 villages of Khatav taluka | खटाव तालुक्यातील ८६ गावांत कोरोनाबाधित रुग्ण

खटाव तालुक्यातील ८६ गावांत कोरोनाबाधित रुग्ण

googlenewsNext

शेखर जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची दमछाक होत आहे. खटाव तालुक्यातील गावांना विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला तालुक्यातील ग्रामपंचायतींनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील ८६ बाधित गावांपैकी ७१ गावांत विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत.

तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन परिवीक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले होते. त्यानुसार तहसीलदार किरण जमदाडे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सांगितले होते. प्रशासनाच्या आवाहनाला तालुक्यातील गावागावांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील ८६ कोरोनाबाधित गावांपैकी ७१ गावांत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. चिंचणी, ललगुण, नवलेवाडी, डिस्कळ, चोराडे, जयराम स्वामींचे वडगाव, गोरेगाव (वांगी), सातेवाडी, नायकाची वाडी, पेडगाव, वर्धनगड, पुसेगाव, शिरसवडी, गुरसाळे, अंबवडे, निमसोड, शेनवडी, बनपुरी, पळसगाव, दातेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, विखळे, बोंबाळे, कातरखटाव, तडवळे, डांभेवाडी, वेटणे, बुध, मांजरवाडी, कातळगेवाडी, खातगुण, निढळ, बेलेवाडी, पुसेसावळी, वडी, थोरवेवाडी, नागाचे कुमठे, सिद्धेश्वर कुरोली, दरूज, शास्त्रीनगर, नढवळ, हिंगणे, येरळवाडी, गोसाव्याचीवाडी, मोराळे, गुंडेवाडी, म्हासुर्णे, येरळानगर, हनुमाननगर, चितळी, जांब, जाखणगाव, विसापूर, येळीव, कोकराळे, जायगाव, भोसरे, औंध, मायणी या गावांत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत.

याशिवाय तालुक्यातील उर्वरित काही बाधित गावांतही विलगीकरण कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आलेल्या ठिकाणी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे तसेच प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी भेटी देत आहेत.

‌ चौकट :

प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी तालुक्यातील नागरिकांना गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कोरोनाला गावपातळीवरच प्रतिबंध करण्यास मोठी मदत झाली आहे.

- किरण जमदाडे, तहसीलदार

चौकट ......

वडूजला विलगीकरणाची प्रतीक्षा

वडूजमधील ग्रामीण रुग्णालयात व खासगी दवाखान्यात कोविड सेंटर सुरू आहे. तिथे लक्षणे असणाऱ्या तालुक्यातील रुग्णांना दाखल केले जात आहे. मात्र वडूज शहरातील गेल्या महिनाभरात कोरोनाचा विस्फोट सुरू आहे. गृह विलगीकरणातील काही रुग्ण चार दिवसांतच बाहेर फिरत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसत आहे. शहरात विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. येथील नगरपंचायत मुख्याधिकारी, अधिकारी आणि नगरसेवकांची चर्चाही झालेली होती. मात्र काहीच हालचाली झाल्या नाहीत.

Web Title: Coronavirus patients in 86 villages of Khatav taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.