CoronaVirus Satara Updates-पार्लेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 PM2021-05-12T16:35:53+5:302021-05-12T16:36:38+5:30
CoronaVirus Satara : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी भरारी पथकाने विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई करून साडेतीन हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईमध्ये पंचायत समितीचे ए. व्ही. उदगावकर, शामराव पवार, ग्रामसेवक मदन बेंद्रे यांनी सहभाग घेतला. यावेळी शिनाभाऊ माने, विजय मदने उपस्थित होते.
कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी भरारी पथकाने विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई करून साडेतीन हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईमध्ये पंचायत समितीचे ए. व्ही. उदगावकर, शामराव पवार, ग्रामसेवक मदन बेंद्रे यांनी सहभाग घेतला. यावेळी शिनाभाऊ माने, विजय मदने उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन पुकारुन १४४ कलम लागू करून विनाकारण, विनामास्क तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करत याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली असून, सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याच अनुषंगाने मंगळवारी भरारी पथकाने सकाळी साडेअकराच्या सुमारास पार्लेला भेट दिली. यावेळी संपूर्ण गावात फेरफटका मारून विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे ग्रामस्थ सतर्क झाले असून, फुशारकी मारणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे.
पथकाचे प्रमुख उदगावकर यांनी भरारी पथकाच्या अशा भेटी दिल्या जातील. त्यामध्ये जे कोणी विनाकारण विनामास्क फिरताना सापडतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.