CoronaVirus Satara updates :फलटणची स्मशानभूमी पडू लागली अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:05 PM2021-04-24T12:05:38+5:302021-04-24T12:07:19+5:30
CoronaVirus Satara updates :: फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंस्करासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्याजवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे. तरी आगामी काळात फलटण नगरपरिषदेची अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमी तयार करण्यात यावी. अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.
फलटण : फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंस्करासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्याजवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे. तरी आगामी काळात फलटण नगरपरिषदेची अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमी तयार करण्यात यावी. अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.
फलटण शहरात व तालुक्यात कोरोनामुळे दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या हि साधारणपणे २० एवढी आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर फलटण नगर परिषदेचे कर्मचारी हे अंत्यसंस्कार करीत आहेत. त्यामुळे फलटण नगरपरिषदेच्या अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी फलटण नागरपालिकने अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव घेण्यासाठी विशेष सभा बोलवावी. व या ठरावास तातडीने प्रशासकीय मंजुरी सुद्धा देण्यात यावी असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी यांचे वेळ खूप जात आहे. तरी फलटण नगरपालिकेने विशेष सभा बोलावून अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव तातडीने घ्यावा व त्या संबंधित पावले नगरपालिकेने तातडीने उचलावीत, अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.