कोयनेचे दरवाजे एक फुटावर, धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा : तारळीतून पाणी सोडणे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:17 IST2018-09-04T14:15:35+5:302018-09-04T14:17:18+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे.

कोयनेचे दरवाजे एक फुटावर, धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा : तारळीतून पाणी सोडणे बंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर असून पायथा वीजगृहसह दरवाजातून ११ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा आहे. तर तारळी धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात यंदा सतत पाऊस होत आहे. त्यामुळे पाणीसाठा चांगला होऊन धरणेही लवकर भरली. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर धरणात २३६५४ क्युसेक पाण्याची आवक होत होती. सकाळी साडे नऊपासून धरणाचे सहा दरवाजे एक फुटापर्यंत उघडण्यात आले असून त्यातून ९२१४ आणि पायथा वीजगृहातून २१०० असा ११३१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धोम धरणात १२.९५ टीएमसी साठा असून ७२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कण्हेरमधून ५७४, बलकवडी धरणातून ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणात ९.८४ टीएमसी साठा असून ४५० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर तारळी धरणात ८०० क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.