३६० प्रशासकीय कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात अधिकार्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी
By admin | Published: May 15, 2014 11:36 PM2014-05-15T23:36:15+5:302014-05-15T23:37:13+5:30
सातारा : जळगाव, ता. कोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या कामासाठी १०० मतमोजणी पर्यवेक्षक, १०० सहायकांची नेमणूक करण्यात आली
सातारा : जळगाव, ता. कोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या कामासाठी १०० मतमोजणी पर्यवेक्षक, १०० सहायकांची नेमणूक करण्यात आली असून या कामावर निवडणूक निरीक्षक यांच्या वतीने देखरेख करण्यासाठी ११० सूक्ष्म निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय इतर अनुषंगिक कामांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ५० अधिकारी, कर्मचार्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक सुखजितसिंंग बन्स व निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी आज भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनंदा गायकवाड, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आनंद कटके उपस्थित होते. (प्रतिनिधी)