खटाव तालुक्यातील ७२ गावांच्या मालमत्तेची मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:25+5:302021-07-17T04:29:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यातील ज्या गावांचे नगर भूमापन मोजणी काम झालेले नाही त्या गावांची ड्रोनद्वारे मोजणी ...

Counting of properties of 72 villages in Khatav taluka | खटाव तालुक्यातील ७२ गावांच्या मालमत्तेची मोजणी

खटाव तालुक्यातील ७२ गावांच्या मालमत्तेची मोजणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यातील ज्या गावांचे नगर भूमापन मोजणी काम झालेले नाही त्या गावांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत अकरा गावांचे भूमापन झाले आहे. जमावबंदी आयुक्त व उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यातील ७२ गावांतील नैसर्गिक साधनसंपत्तीची डिजिटल नोंद केंद्र सरकारच्या सर्व्हे ऑफ इंडियाकडून करण्यात येणार आहे,’ अशी माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख कृष्णा सांगवीकर यांनी दिली.

खटाव तालुक्यातील चिंचणी, अनपटवाडी, गारुडी, पांगरखेल, काटेवाडी, फडतरवाडी (बुध), शिंदेवाडी, नवलेवाडी, नागनाथवाडी, पवारवाडी, रेवलकरवाडी, जांभ, बिटलेवाडी, भांडेवाडी, खबालवाडी, नांदोशी, त्रिमली, लांडेवाडी, वडी, पारगाव, गिरिजाशंकरवाडी, लाडेगाव, उंचीटाणे, वांझोळी, पळशी, गोपूज, येळीव, उंबर्डे, वरूड, कोकराळे, लोणी, धकटवाडी, गणेशवाडी (औंध), कांरडेवाडी, खरशिंगे, मुसांडवाडी, भूषणगड, होळीचागाव, शेणवडी, रहाटणी, नायकाचीवाडी, गणेशवाडी (वडूज), नढवळ, सातेवाडी, काळेवाडी, बोंबाळे, डांभेवाडी, यलमरवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, बनपुरी, पळसगाव, अनफळे, कानकात्रे, ढोकळवाडी, गुंडेवाडी, मोराळे, मरडवाक, गोरेगाव (निमसोड), कणसेवाडी, खातवळ, कान्हरवाडी, पडळ, हिवरवाडी, मुळीकवाडी, गारवडी, तरसवाडी, गारळेवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी व पिंपरी या ठिकाणी ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचे काम सुरू होणार आहे.

गावामधील ओढे, विहिरी, झाडे, जमीन व शेती पिके यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. उर्वरित गावांचे सर्वेक्षण २ ऑगस्टपासून सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक सांगवीकर यांनी दिली.

Web Title: Counting of properties of 72 villages in Khatav taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.