मतमोजणीच्या होणार २२ ते ३२ फेर्‍या जिल्हाधिकारी : सातारा प्रशासन सज्ज; उमेदवार प्रतिनिधींना ओळखपत्र बंधनकारक

By admin | Published: May 13, 2014 11:45 PM2014-05-13T23:45:22+5:302014-05-13T23:45:59+5:30

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. १६ रोजी मतमोजणी होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

Counting of votes for 22 to 32 rounds: Satara administration ready; Identity card is binding on the candidates representatives | मतमोजणीच्या होणार २२ ते ३२ फेर्‍या जिल्हाधिकारी : सातारा प्रशासन सज्ज; उमेदवार प्रतिनिधींना ओळखपत्र बंधनकारक

मतमोजणीच्या होणार २२ ते ३२ फेर्‍या जिल्हाधिकारी : सातारा प्रशासन सज्ज; उमेदवार प्रतिनिधींना ओळखपत्र बंधनकारक

Next

 सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. १६ रोजी मतमोजणी होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघनिहाय २२ ते ३२ फेर्‍या होणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी मतमोजणीचे ठिकाण पहिल्यांदाच बदलण्यात आले असून मतमोजणी कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सकाळी ७ वाजता मतमोजणी केंद्रात उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. आवश्यक असणारे ओळखपत्र दिसेल असे लावावे. मतमोजणीची सर्व प्रक्रीया सलग पूर्ण करण्यात येणार असल्यामुळे उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींनी सकाळी मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यापूर्वीच नाश्ता करून यावा. मतमोजणी केंद्रापासून ५०० मीटर परिसरात शामियाना उभारला आहे. येथे आवश्यक ते शुल्क देऊन नाष्टा करता येणार आहे. मतमोजणीदरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल ठेवली जाणार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय २२ ते ३२ फेर्‍या होणार असून यापैकी वाई मतदारसंघात ३२, कोरेगाव २५, कºहाड उत्तर २४, कºहाड दक्षिण २२, पाटण २९ तर सातारा मतदारसंघात ३१ अशा मतमोजणी फेर्‍या होणार आहेत. उमेदवारांनी कळविलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना नेमून दिलेल्या मतमोजणीच्या टेबल समोरुन उठून मतमोजणी केंद्रात इतरत्र अजिबात फिरता येणार नाही. उमेदवारांना, प्रतिनिधींना मशिन हाताळता येणार नाही. मतमोजणीप्रसंगी एखाद्या मशिनवरील निकाल प्रदर्शित होत नसेल तर निवडणूक आयोगाने पाठविलेल्या अभियंत्यांकडे असलेली निकाल प्रदर्शित करण्याची पर्यायी यंत्रणा जोडून निकाल प्रदर्शित करण्यात येतील. काही कारणाने बॅटरी उतरली असल्यास दुसरी बॅटरी जोडूनही निकाल प्रदर्शित करण्यात येतील अथवा मशिनला प्रिंंटर जोडूनही निकालाची प्रिंंट काढता येणार आहे. यानंतरही येवढे करुनही काहीवेळा निकाल प्रदर्शित होत नसल्यास आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. प्रत्येक मतमोजणीच्या टेबलवर प्रदर्शित होणारे निकालांचा अहवाल तयार करुन मतमोजणी पर्यवेक्षक व उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधीची त्यावर सही घेतली जाणार आहे. त्याची एक प्रत मतमोजणी प्रतिनिधींना देण्यात येणार आहे. मतमोजणीची प्रत्येक फेरी झाल्यानंतर फेरीचे निकाल मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. शुक्रवारपर्यंत १ हजार २३ पोस्टल मते प्राप्त झाली आहेत. अजूनही पोस्टल मते प्राप्त होत आहेत. पोस्टल मते मोजण्यासाठी ४ टेबलची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोणास काही शंका असल्यास जागेवर त्यांचे निरसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मतमोजणी केंद्रावर केंद्रीय निवडणूक निरीक्षकही उपस्थित असणार आहेत. काही मुद्दा उपस्थित झाल्यास निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यावर निर्णय घेतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. म्हणाले. दरम्यान, उपस्थित उमेदवार व प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणची व्यवस्था व सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Counting of votes for 22 to 32 rounds: Satara administration ready; Identity card is binding on the candidates representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.