कºहाडला ग्रामपंचायतींची मतमोजणी शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:23+5:302021-01-19T04:39:23+5:30
निवडणूक विभागाकडून मतमोजणी संदर्भात योग्य नियोजन करण्यात आले होते. आठ टप्प्यात वेगवेगळ्या ग्रामपंचायतींची मतमोजणी ठेवण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ...
निवडणूक विभागाकडून मतमोजणी संदर्भात योग्य नियोजन करण्यात आले होते. आठ टप्प्यात वेगवेगळ्या ग्रामपंचायतींची मतमोजणी ठेवण्यात आली होती. त्यानुसार सकाळी पावणेनऊ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना भेदा चौकात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टप्प्यातील ग्रामपंचायतींचा उल्लेख करून त्यांना मत मोजणीसाठी बोलविण्यात येत होते. त्यांचा निकाल जाहिर होताच त्यांना बाहेर पाठवून पुढील गावातील प्रतिनिधींना बोलविले जात होते.
निकाल जाहिर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करू नये, गुलाल उधळू नये, मिरवणूक काढू नये, याबाबत पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विजयी उमेदवारांचे समर्थक अल्प प्रमाणातच केंद्राबाहेर आल्याचे दिसत होते. आपापल्या गावात जाऊन विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.
फोटो : १८केआरडी०४
कॅप्शन : कºहाड येथे सोमवारी मतमोजणी केंद्राबाहेर निकाल ऐकण्यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : अरमान मुल्ला)