कृष्णा साखर कारखान्यासाठी मतमोजणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 10:55 AM2021-07-01T10:55:29+5:302021-07-01T10:57:02+5:30
Karad Krsuna Sugar factory Satara : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत गुरुवारी प्रारंभ झाला मतमोजणीच्या ठिकाणी खडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कऱ्हाड : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत गुरुवारी प्रारंभ झाला मतमोजणीच्या ठिकाणी खडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कारखाना इतिहासात प्रथमच मतदान केंद्रनिहाय मतमोजणी दोन फेर्यात होत आहे. सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणार्या कृष्णा कारखान्यासाठी मंगळवारी चुरशीने तब्बल 91 टक्के मतदान होऊन 34 हजार 530 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गुरुवारी सकाळी सकाळी 8 वाजता 74 टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. 74 टेबलसाठी सुमारे 300 कर्मचारी काम करत आहे.
प्रत्येक टेबलवर दोन मतदान केंद्राची मोजणी होणार आहे. पहिल्या फेरीचा निकाल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लागेल, अशी शक्यता निवडणूक निर्णय अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसर्या फेरीची मतमोजणी दुपारी 4 नंतरच पूर्ण होऊन निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत होत असून मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार ? याबाबत मोठी उत्सुकता आहे