संस्कारक्षम पिढीमुळे देश महासत्ता बनेल
By admin | Published: February 10, 2015 09:44 PM2015-02-10T21:44:21+5:302015-02-10T23:57:59+5:30
एन. जे. पवार : वेणूताई चव्हाण महाविद्यालयात वार्षिक स्नेहमेळावा
कऱ्हाड : ‘साठच्या दशकातील अमेरिकन राज्यकर्त्यांनी युवकांना ‘दि ग्रेट अमेरिकन ड्रीम’ दाखवले. तसेच ‘दि ग्रेट इंडियन ड्रिम’ आपल्या युवा पिढीला दाखविले पहिजे. ज्ञान, कौशल्ये, सकारात्मक दृष्टीकोन आणि मुल्यांनी संस्कारीत झालेली तरूण पिढीच भारताला महासत्ता बनवू शकेल,’ असे मत शिवाजी विद्यापिठाचे कुलगूरू डॉ. एन. जे. पवार यांनी व्यक्त केले.
येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील होते. संस्थेचे सदस्य शंकराप्पा संसुद्दी, नंदकुमार बटाणे, दिलीप चव्हाण, सह्याद्री कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब यादव, अॅड. दादासाहेब जाधव, रामभाऊ कणसे, डॉ. बी. एन. गोफणे, प्राचार्य डॉ. बजेकल उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, ‘आजची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती यामध्ये फरक आहे. आज जागतिक संचार वाढलेला आहे. त्यामुळे विचारांची व कल्पनेची विशालताही वाढली आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. परिणामी रोजगाराच्या संधीही वाढलेल्याा आहेत. त्याचा या तरूण डिजिटल पिढीने लाभ उठविला पाहिजे.’
कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांना संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. स्वागत प्राचार्य बी. एन. कालेकर यांनी केले.
प्रास्ताविक प्रा. पी. एम. चव्हाण यांनी तर पहुण्यांचा परिचय प्रा. नगरकर यांनी करून दिला. प्राचार्य बी. एन. कालेकर यांनी अहवाल वाचन केले. उपप्राचार्य व्ही. डी. घाडगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)