खोडद फाटा येथील अपघातात दाम्पत्य गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:27+5:302021-01-19T04:40:27+5:30
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड बाजूने साताऱ्याकडे जाताना खोडद हद्दीत एका दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघेही पती-पत्नी ...
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड बाजूने साताऱ्याकडे जाताना खोडद हद्दीत एका दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. लक्ष्मण विष्णू चव्हाण (वय ४५, रा. गोपाळनगर कर्वे, ता. कऱ्हाड), अशी जखमींची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खोडद फाटा येथे दुचाकी (एमएच ११ बीबी ९८१४) वरील लक्ष्मण चव्हाण यांचा ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला जोराने धडकली. त्यामुळे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत पथकाचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, धनाजी घारे, शंकर मठ, तानाजी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
त्यावेळी जखमींच्या पर्समधून काही मौल्यवान वस्तू, तसेच महत्त्वाची कागदपत्रे खाली रस्त्यावर पडली असताना सर्व एकत्र करून त्यांच्या मोबाइलवरून नातेवाइकांना अपघाताची माहिती देऊन आगा यांनी सर्व मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे नातेवाइकांकडे सुपूर्द केली. या भागातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल असल्याने बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी ठिकठिकाणी ड्यूटीवर तैनात असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती.