कऱ्हाडात बॅडमिंटनसाठी हुवा कोर्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:47+5:302021-07-07T04:47:47+5:30
कऱ्हाड येथे वुडन कोर्टवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हुवा कोर्ट असावे, अशी मागणी बॅडमिंटन क्लबकडून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली ...
कऱ्हाड येथे वुडन कोर्टवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हुवा कोर्ट असावे, अशी मागणी बॅडमिंटन क्लबकडून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. तत्पूर्वी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी सहकाऱ्यांसह पाहणी करून पालकमंत्र्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले होते. सध्याचे बॅडमिंटन कोर्ट पंचवीस वर्षे जुने झाले आहे. त्याठिकाणी असणाऱ्या वुडन कोर्टवर खेळाडू सराव करीत होते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिंथेटिक हुवा कोर्टवरच्या सरावाची गरज असते. त्याठिकाणी आपले खेळाडू कमी पडत होते. त्यामुळे कऱ्हाड बॅडमिंटन क्लबनेही पालकमंत्र्यांकडे शिवाजी स्टेडियमवर सिंथेटिक हुवा कोर्टची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून हा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आदेश दिले. या कामाला वीस लाखांपेक्षा जास्त खर्च येणार असून, हा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार हुवा कोर्ट बसविण्याचे काम तत्काळ करण्यात आले आहे. त्यामुळे कऱ्हाडचे बॅडमिंटन खेळाडू आता राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळासाठी सराव करू शकणार आहेत. अनेक वर्षांचे खेळाडूंचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.
फोटो : ०५केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर बॅडमिंटनसाठी हुवा कोर्ट बसविण्याचे काम सध्या सुरू आहे.