बॅडमिंटन हॉलमध्ये ७८ बेडचे कोविड हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:47+5:302021-04-27T04:40:47+5:30

सातारा : राज्यासह जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा ...

Covid Hospital with 78 beds in Badminton Hall | बॅडमिंटन हॉलमध्ये ७८ बेडचे कोविड हॉस्पिटल

बॅडमिंटन हॉलमध्ये ७८ बेडचे कोविड हॉस्पिटल

Next

सातारा : राज्यासह जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात ७८ ऑक्सिजन बेड असून, कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहे. रुग्णांना यामुळे निश्चितच एक दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांना अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत शासनाने कडक निर्बंध घातलेले आहेत, तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, त्याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे. तरी नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे, असे सांगून ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहेत, अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, वेळोवळी हाताची स्वच्छता, सुरक्षित अंतर व विनाकरण घराबाहेर पडू नये. या कोरोनाच्या लढाईत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

फोटो ओळ : सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई व इतर उपस्थित होते.

Web Title: Covid Hospital with 78 beds in Badminton Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.