वाईमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी कोविड टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:17+5:302021-05-01T04:36:17+5:30

वाई : कोरोनाचा कहर वाढला असून अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ ...

Covid Task Force to confront Corona in Wai | वाईमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी कोविड टास्क फोर्स

वाईमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी कोविड टास्क फोर्स

Next

वाई : कोरोनाचा कहर वाढला असून अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होताना दिसत आहे. या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वाईमध्ये ‘कोविड टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे.

एप्रिल महिन्यात राज्यासह देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाई शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्याही लक्षणीय वाढत आहे. तसेच राज्यात काही जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच विषाणूचा नवीन आलेला ट्रेंड यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

प्रशासन आपल्या पातळीवर सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. परंतु कोरोनाचे संकट एवढे महाभयंकर आहे की प्रशासनालाही समाजाची साथ मिळणे गरजेचे आहे.

ही गरज व महत्त्व ओळखून वाई येथील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी एकत्र येऊन कोविड टास्क फोर्सची स्थापना केली आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून सामाजिक संस्था प्रशासन, पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सेवा पुरवणे तसेच सामान्य माणसांना

मोफत जेवणाची सोय,

घरी विलगीकरणात असणाऱ्यांना मोफत औषधे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, कोरोनाविषयी जनजागृती करणे, कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रचार व प्रसार करणे तसेच सामान्य नागरिक, गरिबांना उपचार घेत असताना येणाऱ्या अडचणी दूर करणार आहे. यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणे. येणाऱ्या समस्या सोडवणे हा मुख्य उद्देश आहे. कोविड टास्क फोर्सचा प्रारंभ प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थित केला.

चौकट :

कोरोनाचे संकट महाभयंकर रूप धारण करत असून याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ लागले आहेत. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ऑक्सिजन, इंजेक्शनची कमतरता, सामान्य नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा या समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. यामुळे अडचणीतल्या गरजू नागरिकांना मदत करणे एक कर्तव्य समजून कोरोना टास्क फोर्सची स्थापना केली आहे अशी माहिती कोविड टास्क फोर्सच्या समन्वयकांनी दिली आहे.

Web Title: Covid Task Force to confront Corona in Wai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.