कोविड लसीकरणाचा आज प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:21+5:302021-01-16T04:43:21+5:30

सातारा : कोविड संसर्ग प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून, १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता लस देण्यात येणार आहे. याचा ...

Covid vaccination starts today | कोविड लसीकरणाचा आज प्रारंभ

कोविड लसीकरणाचा आज प्रारंभ

Next

सातारा : कोविड संसर्ग प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून, १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता लस देण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यात प्रारंभ कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, साताराच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे, तर उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थित प्रारंभ कार्यक्रम होणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, ग्रामीण रुग्णालय पाटण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे, ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे, खंडाळा आणि मिशन हॉस्पिटल, पाचगणी येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थित प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Web Title: Covid vaccination starts today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.